महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोळसा आयात 212 दशलक्ष टनवर

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत देशातील कोळशाची आयात वार्षिक आधारावर 1.65 टक्क्यांनी किंचित वाढून 212.2 दशलक्ष टन झाली आहे. इंटर-ट्रेड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म एम जंक्शन सर्व्हिसेस लिमिडेट्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या (2022-23) याच कालावधीत भारताची कोळसा आयात 208.7 दशलक्ष टन होती. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत, नॉन-कोकिंग कोळशाची आयात 136.4 दशलक्ष टन होती, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत आयात केलेल्या 136.9 दशलक्ष टनांपेक्षा थोडी कमी आहे.

Advertisement

 4 कोटी टन कोळशाची आयात

एप्रिल-जानेवारी 2023-24 या कालावधीत कोकिंग कोळशाची आयात 4.73 कोटी टन इतकी झाली आहे , जी गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत नोंदवलेल्या 4.60 कोटी टनांपेक्षा जास्त आहे. प्रमुख आणि बिगर प्रमुख बंदरांद्वारे कोळशाची आयात जानेवारीमध्ये 19.8 दशलक्ष टनांवर पोहोचली, जी गेल्या आर्थिक वर्षातील याच महिन्यात 16.9 दशलक्ष टन होती. जानेवारी 2024 मध्ये एकूण कोळशाच्या आयातीपैकी नॉन-कोकिंग कोळशाची आयात 12.1 दशलक्ष टन होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 10 दशलक्ष टन होती. या वर्षी जानेवारीमध्ये कोकिंग कोळशाची आयात 45 लाख टन होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 47.4 लाख टन इतकी होती, असे सांगितले जात आहे.

किती झाले उत्पादन

सरकारच्या अंतरिम आकडेवारीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधीत देशातील कोळसा उत्पादन 784.1 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे, जे 2022-23 मधील याच कालावधीतील 698.9 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article