For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोचिंग दुर्घटना : सीबीआयने घेतली चौकशीची सूत्रे

06:03 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोचिंग दुर्घटना   सीबीआयने घेतली चौकशीची सूत्रे
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या एका शिकवणी केंद्रात काही दिवसांपूर्वी तळघरात पाणी आल्याने बुडून ती विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयने चौकशीसाठी आपल्या हाती घेतले आहे. तसेच या शिकवणी केंद्राच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठविली आहे. राऊज आयएएस सर्कल असे या शिकवणी केंद्राचे नाव आहे. या केंद्राचा सीईओ अभिषेक गुप्ता याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

27 जुलैला दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळल्याने या शिकवणी केंद्राच्या तळघरात अचानक पाणी शिरले होते. याच तळघरात या केंद्राचे वाचनालय होते. तेथे त्यावेळी आयएएसच्या अभ्यासक्रम शिकणारे तीन विद्यार्थी अभ्यास करीत होते. अचानकपणे तळघर पूर्ण पाण्याने भरल्याने या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यांचा बुडून मृत्यू झाला. तळघराचे बांधकाम सदोष असल्याचे नंतर तपासात स्पष्ट झाल्याने आता केंद्राविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

Advertisement

50 लाख रुपयांची भरपाई

राऊ आयएएस सर्कल या संस्थेने तीन मृत विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना घडल्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने पाणी शिरलेली 25 तळघरे बंद केली आहेत. त्यांना सील ठोकण्यात आले आहे. पण ही कारवाई बऱ्याच विलंबाने करण्यात आली. इमारतींच्या तळघरात केवळ वाहने ठेवण्याची अनुमती असते. पण अनेक महानगरांमध्ये या जागेचा उपयोग नियमांच्या विरोधात जाऊन व्यापारी उद्देशांसाठी केला जातो. महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हे घडत असते, असा आरोप करण्यात आला असून आता सीबीआय चौकशीकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.