For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या 13 रोजी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर

10:11 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री सिद्धरामय्या 13 रोजी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर
Advertisement

विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

Advertisement

वार्ताहर/बाळेकुंद्री

सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासासाठी पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या 21 कोटी रुपयांच्या कामाच्या उद्घाटनविषयी शनिवारी चर्चा करण्यात आली. ऑक्टोबर 13 तारखेला डोंगरावर हाती घेण्यात आलेल्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पर्यटनमंत्री एच. के. पाटील करणार असल्याची माहिती सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी दिली. सौंदत्ती येथील  डोंगरावर पर्यटन विभागाच्या वतीने कोणती कामे करायची आहेत. याची माहिती त्यांनी दिली. पर्यटन विभागाचे संचालक के. व्हा.r राजेंद्र यांनी यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी 21 कोटी खर्चून सुलभ शौचालये बांधली आहेत. 13 तारखेला त्याचे उद्घाटन करून ते यल्लम्मा मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाकडे देखभालीसाठी सोपविण्याची सर्व तयारी सुरू आहे. पर्यटन विभागाचे निर्देशक सौम्या भावट, उपनिर्देशक बसवराज कुरीहुली, मंदिराचे सीईओ महेश, तहसिलदार एम. हेग्गनावर, देवस्थानचे अधीक्षक नागरत्ना चोळीन  उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.