शिंदेंची सेना हिच खरी शिवसेना...शिंदे गटाचे 16 आमदार पात्र; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिला निकाल
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका देताना विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. खऱी शिवसेना कुणाची यावरून शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना यांच्यात चाललेल्या वादाचा निकाल देताना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शिवसेनेच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नसल्याचे सांगितले.
आपल्या प्रदीर्घ निकालाचे वाचन करताना अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पक्षाचे नेतृत्व ठरवण्यासाठी पक्षाची घटना पुरेशी आहे. तसेच शिवसेनेचा कोणता गट पक्ष आहे हे ओळखण्यासाठी नेतृत्व सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील राजकिय सत्तानाट्य़ाचा आज दुसरा पडता आज उघडणार हे अगोदरच जाहीर झाले होते. त्यामुळे शिवसेनेता शिंदे गट निकाल आपल्याच बाजूला लागणार असे सांगत होता. तर ठाकरे गट अध्यक्षांकडून आपल्याला न्यायाची अपेक्षा असल्याचं व्यक्त होत होता. त्यातच आजच्या निकालापूर्वी सभापती राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उद्धव गटाने आधीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन यामध्ये मॅच फिक्सिंग होणार असा इशारा दिला होता.
कोल्हापूरातून बोलताना आदित्य ठाकरे यांनी, "निकालापूर्वी सभापतींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचा अर्थ ज्यांनी न्याय द्यायचा ते न्यायाधीशच आरोपीला भेटायला गेले असा होतो. इतिहासात यापुर्वी असं कधीच घडलं नाही." अशी जोरदार टिका त्यांनी केली.
आपल्या निकालामध्ये नमुद करताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं सांगून त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत असे म्हटले आहे.
ठाकरे गटाने केलेला पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा दावा फेटाळण्यात येऊन शिवसेनेची पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून तडकाफडकी हटवू शकत नसल्याचं सांगितले आहे. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं ही कृती लोकशाहीला घातक असून त्यामुळे पक्षप्रमुखाविरोधात कोणीही बोलू शकणार नाही. तसेच शिवसेना पक्षाच्या संविधानात राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
तसेच शिवसेना पक्षप्रमुखाला कुणालाही पदावरून हटवण्याचा नसून पक्षाच्या नेतृत्वावर सांगितलेल्या दाव्यासंदर्भात यापुर्वी निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच होती. तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवडच वैध निवड होती असंही अध्यक्षांनी म्हटले आहे.