For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन : लोकभवनमध्ये 'युवा कौशल्य' महोत्सवाचे उद्घाटन

10:18 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरकारी नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळा  मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन   लोकभवनमध्ये  युवा कौशल्य  महोत्सवाचे उद्घाटन
Advertisement

पणजी : प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे कोणत्याही सरकारला शक्य नाही. त्यामुळे दीर्घकाळ सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत राहून पदरी निराशा पाडून घेण्यापेक्षा युवकांनी सद्यस्थितीत जी मिळेल ती नोकरी स्वीकारावी, त्याही पुढे जाताना स्वयंरोजगार करण्याचाही विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Advertisement

दोनापावला येथील लोकभवनमध्ये आयोजित युवा कौशल्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्यास त्यांच्यासमवेत खासदार सदानंद तानावडे आणि यंत्रणेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्या
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कौशल्य विकासाबरोबरच युवकांनी उच्च शिक्षणाच्या संधींचाही लाभ घ्यावा. त्यासाठी सरकार सर्व सहकार्य करेल. त्याचबरोबर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून किमान १२ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तसेच पुढील उच्च्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या युवकांच्या शिक्षणाची संपूर्ण फीसुद्धा सरकार भरणार आहे. त्याचबरोबर या युवकांना पदवी शिक्षणासाठी समन्वयक आणि स्वयंसेवकांचे सहकार्यही देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना भविष्यात स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती दिली.

Advertisement

खासगी क्षेत्रातील किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक
प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे शक्य नाही, किंवा प्रत्येकाने सरकारी नोकऱ्यांची अपेक्षा ठेवू नये, असे आपण म्हणत असलो तरी युवकांनी त्यासाठी प्रयत्न करूच नये, असे नव्हे. अशा नोकऱ्यांसाठी प्रयत्न करतानाच दरम्यानच्या काळात एखाद्या खासगी आस्थापनात नोकरी उपलब्ध झाल्यास तिचाही स्वीकार करावा, कारण भविष्यात सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करताना खासगी क्षेत्रातील किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.