For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया आघाडीकडून वारंवार अपमान...तिथे फार काही चांगली परिस्थीती नाही- नितीश कुमार

05:29 PM Jan 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
इंडिया आघाडीकडून वारंवार अपमान   तिथे फार काही चांगली परिस्थीती नाही  नितीश कुमार
Nitish Kumar
Advertisement

इंडिया आघाडीमध्ये वारंवार अपमान होत असून त्यांची परिस्थिती फार काही चांगली नसल्याचा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी रविवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये राजकिय नाट्य घडत असून इंडिया आघाडीतून बाहेर पडून त्यांनी भाजपच्या एनडीए आघाडीचा रस्ता धरला आहे. आपल्या राजीनामा देण्यामागं नाराजी त्यांना लपवता आली नाही. राज्यपाल आरलेकर यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Advertisement

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, "मी आज आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यापुर्वी आम्ही जी नवी महाआघाडी (ऑगस्ट 2022 मध्ये) तयार केली ती फार काही चांगले काम करेल अशी परिस्थिती दिसत नाही." असा आरोप त्यांनी केला. तसेच जेडीयुचे प्रवक्त्ये वारंवार काँग्रेसवर आरोप करत आहेत कि, इंडिया आघाडीने तसेच काँग्रेसने वारंवार नितीशकुमार यांचा अपमान केला आहे. त्यांनी नितीश कुमार यांना विचारात न घेता मल्लिकार्जून खरगे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले आहे.

आपल्या राजीनाम्यानंतर नितीश कुमार भाजपचा पाठींबा मिळवून पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांच्या हस्ते शपथ ग्रहण करणार आहेत. नितीश कुमार यांना भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.

Advertisement

भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड), किंवा जेडीयू यांच्यात येत्या तीन महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर अंतिम बोलणीही पुर्ण केली आहेत. यापूर्वीच बिहारमधील भाजपच्या सर्व आमदारांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दर्शवणारी पत्रे सादर केली आहेत.

Advertisement
Tags :

.