मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राधानगरी तालुक्यात प्रभावीपणे राबवा– आमदार प्रकाश आबिटकर
राधानगरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांची आढावा बैठक
राधानगरी /प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राधानगरी तालुक्यात प्रभाविपणे राबवण्यासाठी आज राधानगरी येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची आढावा बैठक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदशनाखाली घेण्यात आली, तालुक्यातील कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला आमदार आबिटकर यांनी दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक आनंदा शिंदे यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत असणाऱ्या बहुतांशी अटी शिथिल केल्या आहेत. ही योजना राबवण्यासाठी येणाऱ्या अडचणी अंगणवाडी सेविका यांच्याकडून समजून घेतल्या व यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात येईल व पुढील 15 दिवसात योजनेचा आढावा घेण्यात येईल ,यामुळे योजना तालुक्यात प्रभाविपणे राबवली पाहिजे. राधानगरी विधानसभा मतदार संघातील 50 हजार ते 1 लाख लाभार्थींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभ देण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन काम केले पाहिजे. यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल असे सांगितले.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मिळावी यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करू असे आमदार आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल लिपसे, संजय गांधी समिती अध्यक्ष अरुण जाधव, आत्मा कमिटी अध्यक्ष अशोक फराकटे, सहाय्यक गटविकास अधिकारी रतन साबळे, संरक्षण अधिकारी नवीन गुरव, अशोक वाडेकर,संगीता खाडे, धनश्री पारकर उपस्थित होते.आभार तेजश्री टिपूगडे यांनी मानले