For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्रीसाहेब...! पोकळ वल्गना नको...कारखानदारांना पाठीशी न घालण्यासाठी स्वाभिमानीकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

06:46 PM Mar 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
मुख्यमंत्रीसाहेब     पोकळ वल्गना नको   कारखानदारांना पाठीशी न घालण्यासाठी स्वाभिमानीकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
CM Eknath Shinde Shetkari Sangathana hoisted black flags
Advertisement

वडगांव प्रतिनिधी

गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन १०० रूपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगांव हातकंणगले रोडवर काळे झेंडे दाखविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी हातकणंगले मतदारसंघामध्ये अनेक विकास कामांचे लोकार्पण केले. महिला दिनानिमित्त झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी गतवर्षीच्या थकित 100 रुपयाच्या हप्त्यासाठी मुख्यमंत्री कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

Advertisement

राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर १०० रूपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वत: मध्यस्थी करून पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते. जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रूपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे साजर केले आहेत. मात्र राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे.

जवळपास ३ महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजीटल बोर्ड तयार केला होता. या बोर्डवर १०० रूपयाचा दुसरा हप्ता बुडवून , एफ. आर पी चे तुकडे करून शेतक-यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार , मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका । ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.