For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांनी केले जरांगे पाटलांचे कौतुक ; म्हणाले, बाबा तुझं पोरगं भारी...

01:02 PM Sep 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
मुख्यमंत्र्यांनी केले जरांगे पाटलांचे कौतुक   म्हणाले  बाबा तुझं पोरगं भारी
Advertisement

Eknath Shinde News :  अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. यावेळी जरांगे पाटील यांच्या वडिलांनाही ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं.उपोषण सोडल्यानंतर आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं.

Advertisement

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोजला मी अनेक वर्षापासून ओळखतो. तो कधीही स्वत:साठी नाही तर समाजासाठी लढत आहे. कुठलेही प्रश्न वयक्तिक फायद्यासाठी मांडले नाहीत.त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आंदोलन आणि आमरण उपोषण करणं सोप नाही आणि याला समाजानं पाठिंबा देणं ही मोठी गोष्ट आहे. ज्याचा हेतू स्वच्छ असतो,जनता त्यालाच पाठिंबा देते. रद्द झालेले आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाज शांत आणि शिस्तप्रिय आहे. मागच्या मूक मोर्चात कोठेही गालबोट लागलं नाही. मात्र या आंदोलनात लाठीचार्ज झाला. मनोज जरांगे यांनी 40 दिवसाचा वेळ दिला आहे. रद्द झालेल्या आरक्षणात ज्या त्रूटी सुप्रिम कोर्टाने काढल्या आहेत त्यावर काम सुरु आहे. टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची ठाम भूमिका आहे, अस स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

जरांगे-पाटील यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, मी बाबाला मघाशी सांगितलं तुझं पोरगं भारी आहे.तुझा पोरगा स्वत:साठी नाही,पण समाजासाठी लढतोय.तो निस्वार्थी आहे.तो सच्चा आहे. मी दिल्लीत गेलो. तिथेही मनोजचीच चर्चा, मला काही लोक म्हणाले, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं, वो साधा कार्यकर्ता आहे. ते म्हणाले अरे उसने तो सब को हिला दिया… मनोज मी तुला हे का सांगतोय. कारण तू साधा कार्यकर्ता आहेस म्हणून. अरे तुझी दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, वाक्य तोडून व्हायरल केलं.प्रश्न घ्यायचे नाहीत, फक्त बालून निघायचं असं वाक्य होतं.आमचा पत्रकारांवर विश्वास आहे. मात्र तुम्ही विश्वासघात केला.अस करू नका. मी आत एक आणि बाहेर एक नाही. मी ही शेतकऱ्याचा मुलगा आणि कार्यकता आहे. सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून मुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला याची जाणीव आहे. आज प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी जरांगे यांना भेटायला आलो आहे. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी माही एक माणूनसच असल्याचेही शिंदे म्हणाले.

Advertisement
Tags :

.