For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते अद्ययावत पोलीस सदनिकेचे उद्घाटन

01:03 PM Aug 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
cm devendra fadnavis यांच्या हस्ते अद्ययावत पोलीस सदनिकेचे उद्घाटन
Advertisement

सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या

Advertisement

कोल्हापूर : जुना बुधवारपेठ येथील महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारलेल्या राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुलातील नूतन निवासी इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. रविवारी सर्किट बेंच उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

उद्घाटनानंतर सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आदी उपस्थित होते.

Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभारण्यात आलेल्या पोलीस सदनिकांची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या आर्किटेक्ट, बांधकाम कंत्राटदार यांचाही सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक महेश इंगळे, श्रीराम कन्हेरकर, तानाजी शेंडगे, महिला पोलीस संगिता वराळे, लिपीक विष्णू परीट यांना प्रतिकात्मक चाव्या दिल्या. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिसांसाठी अद्ययावत निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. यामुळे पोलीस दलाचे बळकटीकरण होत असून राहणीमान सुधारणार असल्याचे सांगितले.

मिशन झिरो ड्रग मोहीम

कोल्हापूर पोलीस दलाकडून अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू असून मिशन झिरो ड्रग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत २७ लाख रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.

अद्ययावत १६८ सदनिका

जुना बुधवार पेठ येथे पोलीस अंमलदार यांच्यासाठी सर्व सोयींनीयुक्त सात मजली तीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी ५३८ चौ. फूट क्षेत्राचे टू बीएचके ५६ फ्लॅट असे एकूण १६८ फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत. याठिकाणी लिफ्टची सोय, गार्डन एरिया, प्रशस्त पार्किंग, प्ले ग्राऊंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सोलर सिस्टिम, अग्निशामक, मंदिर, एसटीपी प्लांट अशा सुंदर कॅम्पसची निर्मिती केली आहे.

Advertisement
Tags :

.