For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवणार

05:47 PM Mar 03, 2025 IST | Pooja Marathe
सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवणार
Advertisement

सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

Advertisement

कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे.
प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कोल्हापूरात सर्व विरोधी पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आज पार पडली. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादिवशी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पन्हाळा गडावरील कार्यक्रमाच्या पूर्वी गनिमी काव्याने फडणवीस यांची गाडी अडवू आंदोलन करण्याच्या सूचना काही पदाधिकाऱ्यांनी केल्या. फडणवीसांना जर कोल्हापूरात यायचे असेल तर कोरटकर यांना अटक करून इकडे यावे अशी बैठकीत सर्वांनी भूमिका घेतली.

Advertisement

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोरटकर यांनी धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरले. त्यामुळे कोरटकर यांना अटक व्हावी यासाठी गेले काही दिवस मागणी इंडिया आघाडी खासदार शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि संलग्नित संस्थांनी यांनी केली होती. कोरटकर यांना अटक झाली नाही तर आंदोलन केले जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असेही सांगण्यात आले. ६ तारखेल्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर दौऱ्यावर यायचे असेल, तर त्यांनी कोरटकर यांना अटक करावी नाहीतर आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना (उबाठा) चे नेते विजय देवणे यांनी दिला.

Advertisement
Tags :

.