For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ढगाळ हवामान; बेदाणा काळा पडण्याची भीती

05:46 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
ढगाळ हवामान  बेदाणा काळा पडण्याची भीती
Advertisement

तासगाव :

Advertisement

तालुक्यात गेले २ दिवस ढगाळ व दमट वातावरण आहे. तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम सध्या मध्यावर आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा रॅकवर टाकण्यात आलेली द्राक्षे व बेदाणाही काळा पडण्याची भीती आहे. त्यातच पाऊस आला तर लाखो रुपयांचे नुकसान होत. शेतकरी अस्मानी संकटामुळे पुन्हा मातीत जाणार आहे. यंदा द्राक्षाला चांगला दर असल्याने शेतकरी खुश असून त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. तर काही शेतकरी बेदाणा करत असून द्राक्ष रॅकवर टाकून ते सुकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर रब्बीची गहू, हरभरा व शाळूही काढणी व मळणी या टप्यात असल्याने पावसाने हजेरी लावल्यास नुकसानीची मोठी भीती आहे. 

Advertisement
Advertisement
Tags :

.