ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवात अडथळा
कोल्हापूर :
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवाच्या सुऊ असलेल्या चाचणीच्या दुसऱ्या दिवशी (गुऊवारी) मावळतीची सूर्यकिरणे घणदाट ढगाळ वातावरणामुळे अंबाबाई मंदिरात आलीच नाहीत. त्यामुळे या चाचणीत मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणापर्यंत पोहोचतील, असा बांधलेला अंदाज फोल ठरला. येत्या शनिवार 9 रोजीपासून अधिकृतपणे अंबाबाईच्या किरणोत्सवाला सुऊवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून किरणोत्सवाची चाचणी घेण्यात येत आहे. बुधवारी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता. गुऊवारी सूर्यकिरणे गाभाऱ्यात प्रवेश कऊन अंबाबाईच्या चरणांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज बांधला होता. परंतू ढगाळ वातावरण कायम होते.
म्हणून सूर्यकिरणांच्या तीव्रतेचा अंदाज बांधता आला नाही
गेल्याच महिन्यात अंबाबाई मंदिरालगतचा गऊड मंडप उतऊन घेतला आहे. हा मंडप करवीर संस्थानचे छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत म्हणजेच 1838 ते 1845 या दरम्यान उभारला आहे. मंडप उभारण्यापूर्वीच्या किरणोत्सव काळातील अंबाबाई मंदिर प्रवेश ते अंबाबाई मूर्तीपर्यंतच्या प्रवासातील सूर्यकिरणांची तिव्रता नेमकी किती असायचा याची गुऊवारच्या चाचणीत विविध अनुमानातून पाहणी केली जाणार होती. परंतू ढगाळ वातावरणांमुळे सूर्यकिरणे अंबाबाई मंदिरात आलीच नाहीत. त्यामुळे तीनशे वर्षांपूर्वीच्या सूर्यकिरणांची तिव्रता किती असायची हे पाहता आले नाही, असे विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.