For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नासलेल्या दुधापासून कपड्यांची निर्मिती

06:05 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
नासलेल्या दुधापासून कपड्यांची निर्मिती
Advertisement

लोकरीचे-सुती कापड विसरा, कारण आता दूधाने कपडे तयार केले जात आहेत. जे दूध नासल्यावर आम्ही फेकून देतो, आता त्याच्यापासून डिझाइनर सूट-साडी तयार केली जातेय. फॅशन इंडस्ट्रीतील हे सर्वात चकित करणारे इनोवेशन आहे. याचे नाव मिल्क फॅब्रिक आहे.

Advertisement

एक लिटर दूधापासून केवळ 10 ग्रॅम फॅब्रिक मिळते. म्हणजे एक टी-शर्ट तयार करण्यासाठी 60-70 लिटर दूधाची गरज भासणार आहे. याचमुळे याची किंमत तुलनेत अधिक आहे. एक मीटर मिल्क पॅब्रिकची किंमत 15000 ते 45000 रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच एका साडीची किंमत 3-5 लाख रुपयांपर्यंत पोहोचत असते.

अत्यंत अवघड निर्मिती

Advertisement

मिल्क फॅब्रिक तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत रंजक आहे. सर्वप्रथम दूध नासविले जाते, मग त्यातून केसीन प्रोटीन काढले जाते, या प्रोटीनला पाण्यात विरघळवून द्रवपदार्थ तयार केला जातो, मग त्याला स्पिनिंग मशीनद्वारे रेशोंमध्ये बदण्यात येते. हे रेशो रेशीमसारखे चमकदार आणि मुलायम असतात. मग त्यांना विणून कापड तयार केले जाते, पूर्ण प्रक्रियेत कुठलेही रसायन वापरले जात नाही, यामुळे ते 100 टक्के बायो-डिग्रेडेबल आणि स्कीन-फ्रेंडली आहे.

जुना आहे इतिहास

दूधाने कपडे तयार करण्याचे हे तंत्रज्ञान नवे नाही. 1930 च्या दशकात इटलीत लोकराची मोठी कमतरता निर्माण झाली होती, (दुसऱ्या महायुद्धाच्या काळात) तेव्हा तेथील वैज्ञानिकांनी दूधाने कापड तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी याला ‘लानिटाल’ नाव देण्यात आले होते, जे लाना (लोकर) आणि इटालियाचे मिश्रण होते. मुसोलिनीच्या काळात हे फॅब्रिक अत्यंत लोकप्रिय झाले होते. परंतु युद्ध संपल्यावर स्वस्त लोकर आणि सिंथेटिक फॅब्रिक आल्याने हे गायब झाले होते. आता 2025 मध्ये पुन्हा एकदा याची वापसी झाली आहे.

पसंत करत आहेत लोक

आता सस्टेनेबिलिटीचा काळ आहे. लोक प्लास्टिक आधारित पॉलिएस्टरपासून दूर पळत आहेत. अशा स्थितीत जर्मनीची कंपनी क्यूमिल्कने या जुन्या तंत्रज्ञानाला पुन्हा जिवंत केले आहे. कंपनी केवळ इंडस्ट्रियल वेस्ट मिल्क वापरते. दरवर्षी युरोपमध्ये 20 लाख टन दूध बेकार फेकले जाते. त्यालाच ही कंपनी कपड्यात रुपांतरित करत आहे. या कपड्याचे वैशिष्ट्या तुम्हालाही त्याचा वापर करण्यास भाग पाडणार आहे.

? हे कापड रेशीमपेक्षा 3 पट अधिक मुलायम असते.

? हे अँटी बॅक्टेरियल आहे, म्हणजेच घाम आल्यावर दुर्गंध येणार नाही.

? हे थर्मो-रेग्युलेटिंग आहे, म्हणजेच हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवते.

? अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी हे कापड अत्यंत योग्य आहे.

? हे 100 टक्के नैसर्गिक असून 2 वर्षांमध्ये मातीत विरघळून जाते.

Advertisement
Tags :

.