For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपस्टीनसंबंधी स्पष्टीकरण देणार क्लिंटन

06:44 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
एपस्टीनसंबंधी स्पष्टीकरण देणार क्लिंटन
Advertisement

43 वर्षांमध्ये पहिल्यांदाच साक्ष देणार अमेरिकेचे माजी अध्यक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनी  लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी निगडित संसदीय चौकशीत सामील होण्यास सहमती दर्शविली आहे. यापूर्वी या दांपत्याने चौकशीत सामील होण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांना क्रिमिनल कंटेम्प्टमध्ये (गुन्हेगारी अवमानना) टाकण्यासाठी मतदान केले जात होते.

Advertisement

यासंबंधीचा वाद अनेक महिन्यांपासून सुरू होता, ज्यात क्लिंटन दांपत्याने समितीचा कायदेशीर आदेश फेटाळला होता. समितीने मागील महिन्यात बिपार्टिसन (विरोधी गटांचे एकत्र मिळून काम करणे) मताद्वारे क्लिंटन यांच्यावर अवमाननेची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव संमत केला होता, या प्रस्तावाला काही डेमोक्रेट्स खासदारांचेही समर्थन मिळाले होते.

संबंधित समितीला आम्ही यापूर्वीच जबाब दिला असून एपस्टीनविषयी स्वत:ला असलेली माहिती पुरविली असल्याचे क्लिंटन दांपत्याचे सांगणे आहे. तर यापूर्वी बिल क्लिंटन यांनी एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांची माहिती नव्हती असे सांगत दोन दशकांपूर्वीच त्याच्यासोबतचा संपर्क तोडला होता असा दावा केला होता.

एपस्टीनच्या खासगी जेटच्या लॉग्जनुसार क्लिंटन यांनी 2002 आणि 2003 मध्ये चार आंतरराष्ट्रीय उ•ाणे केली होती. न्याय विभागाकडून जारी रिकॉर्ड्समध्ये काही छायाचित्रे  असून ज्यात क्लिंटन हे एपस्टीनच्या इस्टेटमधील स्वीमिंग पूलमध्ये पोहताना आणि हॉट टबमध्ये पहुडलेले दिसून आले होते.

ही छायाचित्रे अनेक दशके जुनी असून क्लिंटन यांनी एपस्टीनचे गुन्हे उघड होण्यापूर्वीच त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते. क्लिंटन यांच्यावर एपस्टीनच्या पीडितांनी कधीच कुठलाही आरोप केलेला नाही आणि ते कधीच कुठल्याही गैरकृत्यात सामील आढळुन आले नसल्याचे बिल क्ंिलटन यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ एंजेल उरेना यांनी सांगितले होते.

क्लिंटन दांपत्याने मागील महिन्यात समितीचे अध्यक्ष जेम्स कोमर यांना पत्र लिहून त्यांच्या चौकशीवर टीका केली होती. 1983 मध्ये जेराल्ड फोर्ड यांच्या साक्षीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचा माजी अध्यक्ष संसदीय समितीसमोर साक्ष देणार आहे.

Advertisement
Tags :

.