हवामान बदलामुळे वाढला मोठा धोका
जगात पसरतोय ब्रेन ईटिंग अमीबा, नव्या भागांमध्ये फैलावले संक्रमण
वाढते जागतिक तापमान आणि वेगाने बदलणाऱ्या पर्यावरणामुळे जगासमोर नवे अन् गंभीर आरोग्य संकट उभे ठाकले आहे. हवामान बदलामुळे ब्रेन ईटिंग अमीबा अशा भागांपर्यंत फैलावू लागला आहे, जेथे पूर्वी त्याचे नावही ऐकले गेले नव्हते. कमजोर जलपुरवठा प्रणाली आणि अपुरी देखरेख या धोक्याला आणखी वाढवत आहे. हवामान बदल आता केवळ हवामानातील असामान्य उतारचढावापुरती मर्यादित राहिलेले नाही. वैज्ञानिकांनुसार सातत्याने पृथ्वी तप्त होत असल्याने अशा सुक्ष्मजीवांना नव्या क्षेत्रात वाढीची संधी मिळत आहे, जे पूर्वी मर्यादित भागांमध्येच आढळून येत होते. जल, माती आणि आर्द्रतायुक्त वातावरणात राहणारे फ्री-लिव्हिंग अमीबा, ज्यांना सामान्य भाषेत ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ म्हटले जाते, ते आता जागतिक आरोग्यासाठी धोका ठरत चालले आहेत. एका नव्या आंतरराष्ट्रीय अध्ययनात हवामान बदलासोबत जुनी होणारी जलपुरवठा संरचना आणि कमकुवत देखरेख व्यवस्था या धोकादायक सुक्ष्मजीवांच्या फैलावाला वेग देत असल्याचे म्हटले गेले आहे.
पृथ्वीचे तापमान वाढण्यासाब्sात गरम पाणी पसंत करणारे अमीबा अशा भागांपर्यंत पोहोचत आहेत, जेथे पूर्वी ते दुर्लभ मानले जात होते. अलिकडच्या वर्षामध्ये अनेक देशांमध्ये मनोरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या जलाशयांमध्ये याच्याशी निगडित संक्रमणाची प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यामुळे सामान्य लोकांची चिंता वाढली असून जलसुरक्षेवर नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सहनशक्ती व जिवंत राहण्याची क्षमता
जर्नल बायोकंटॅमिनेंटमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार या अमीबाची सर्वात मोठी शक्ती त्याची असाधारण सहनशक्ती आहे. हे अशा स्थितीतही जिवंत राहतात, जेथे अन्य किटाणू नष्ट होतात. भीषण उष्णता, क्लोरिन यासारख्या किटाणूनाशक आणि सुरक्षित मानल्या जाणारी पाण्याची पाइपलाइनही त्यांना नष्ट करू शकत नाही. याचमुळे हे जलपुरवठा प्रणालींमध्ये दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतात. अमीबा माती आणि पाण्यात आढळून येणारे एकल-पेशीय जीव असतात. तर मानवी शरीरात जवळपास 30-40 लाख कोटी पेशी असतात, तर अमीबामध्ये केवळ एकच पेशी असते. याच एका पेशीच्या मदतीने हा जीव अन्न शोधतो, त्याला ग्रहण करतो, पचवितो आणि मग अपशिष्ट म्हणून बाहेर काढतो.
उपाययोजनांची दिशा
या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक वन हेल्थ दृष्टीकोन अवलंबिण्यावर भर देत आहेत. या दृष्टीकोनात मानवी आरोग्य, पर्यावरणशास्त्र आणि जलव्यवस्थापनाला एकत्र जोडून पाहिले जाते.