2.61 कोटी मुलांच्या शिक्षणाला प्रभावित करतेय हवामान
हवामान संकट आता केवळ हवामान किंवा पर्यावरणाची समस्या राहिलेले नाही. हे मुलांची शाळा आणि त्यांच्या शिक्षणापर्यंत पोहोचले आहे. युनिसेफच्या नव्या अहवालानुसार 2025 मध्ये जगभरात कमीतकमी 17.1 कोटी विद्यार्थ्यांचे शिष्घ्णपूर, वादळ, उष्मालाट आणि अन्य हवामान आपत्तींमुळे बाधित झाले. यात केवळ भारतातील 2.61 कोटीहून अधिक मुले सामील आहेत. म्हणजेच जागतिक स्तरावर प्रभावित दर 100 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 15 भारतीय होते.
युनिसेफच्या नव्या अहवालाचे नाव ‘लर्निंग इंटरप्टेड : ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट-रिलेटेड स्कूल डिरप्शन्स इन 2025’ असून यात 106 देशांच्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. भारतात वादळ सर्वात मोठे कारण ठरले, शाळांमध्ये पाणी भरणे, इमारतींचे नुकसान होणे किंवा भीषण उष्णतेमुळे वर्ग बंद करावे लागले. हे केवळ एक-दोन दिवसांच्या शिक्षणाचे नुकसान नाही. वारंवार शाळा बंद राहिल्याने शिक्षणाचा वेग तुटतो आणि दीर्घ काळात शाळा सोडण्याचा धोका वाढतो.
जागतिक स्तरावर वादळाने सुमारे 10.9 कोटी मुलांचे शिक्षण प्रभावित केले. पूराने कमीतकमी 7 कोटी आणि उष्मालाटेने सुमारे 5 कोटी मुलांना प्रभावित केले. अनेक ठिकाणी शाळा बंद झाल्या, ऑनलाइन वर्ग घ्यावे लागले किंवा उपस्थिती घटली. पाकिस्तानात मान्सून पूरामुळे 2.8 कोटीहून अधिक मुलांच्या शाळेतील वापसीला विलंब झाला. इजिप्तमध्ये देखील इतकीच मुले प्रभावित झाली आहेत.
भारतासाठी हा आकडा चिंताजनक आहे, कारण येथे मुलांची मोठी संख्या आहे आणि हवामान जोखिम अधिक आहे. वादळ, पूर आणि उष्णतेचा प्रकोप शिक्षणव्यवस्थेला कमकुवत करत आहे. 40 देशांमध्ये वर्षभरात अनेकदा शिक्षण बाधित झाले. मादागास्कर आणि स्पेन यासारख्या देशांमध्ये देखील वारंवार घटना नोंद झाल्या.
मुलींवर भार अधिक
प्रभावित 17.1 कोटी विद्यार्थ्यांपैकी सुमारे 75 टक्के कमी किंवा मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये राहतात. या देशांमध्ये शाळा सुरक्षित ठेवणे आणि आपत्तीनंतर लवकर बहाल करण्याची साधनसामग्री कमी आहे. मुलींसाठी धोका आणखीच वाढतो. शाळा आणि शौचालयांचे नुकसान होणे, परिवार विस्थापित होणे आणि उत्पन्न घटल्यावर घराची जबाबदारी मुलींवर येते, यामुळे शाळा वापसी अवघड ठरते आणि बालविवाहाचा धोका देखील वाढतो.
जर पावले उचलली गेली नाहीत, तर 2025 मध्ये प्रभावित मुलांना त्याच्या पूर्ण जीवनातील कमाईत कमीतकमी 20 हजार कोटी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. याचा प्रभाव उत्पादकता आणि गरीबी कमी करण्यावरही पडणार असल्याचा युनिसेफचा अनुमान आहे.
क्लायमेट रीजिलिएंट
हवामान आपत्ती मुलांचे जीवन आणि भविष्य दोन्हींसाठी धोकादायक आहे, शाळांच्या मूलभूत सुविधांना मजबूत करणे, आपत्तीदरम्यान शिक्षण जारी ठेवण्याची व्यवस्था, वित्तपोषण वाढविणे आणि मुलांना हवामान ज्ञान देणे आवश्यक आहे. आकड्यांना मजबूत करत पूर्वीपासून अनुमान लावणे देखील महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार युनिसेफच्या कार्यकारी संचालिक कॅथरीन रसेल यांनी काढले आहेत. भविष्यात जोखीम आणखी वाढणार आहसे, 2050 पर्यंत भीषण उष्मालाटेचा धोका आठपट आणि पूर तीनपट वाढू शकतो. याचमुळे आतापासून तयारी करावी लागेल. शाळा केवळ इमारती नाहीत, मुलांच्या स्वप्नांचा मार्ग आहे. हवामान संकटापासून या मार्गाला वाचविणे आता आवश्यक ठरले आहे. सरकार, समुदाय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांना मिळून काम करावे लागेल, जेणेकरून प्रत्येक मुलाचे शिक्षण सुरक्षित राहू शकेल असे त्यांनी सांगितले आहे.