सावंतवाडी युवासेना तालुकाप्रमुख पदी क्लेटस फर्नांडिस
सावंतवाडी । प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेतर्फे नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना तालुका युवा सेना अध्यक्षपदी क्लेटस फर्नांडिस यांची तर प्रशांत सुरेश जाधव यांची सावंतवाडी तालुका युवासेना मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख म्हणुन नियुक्ती झाली आहे. हर्षदा भरत जाधव यांची सावंतवाडी तालुका महिला आघाडी मागासवर्गीय सेल अध्यक्षपदी तर वसंत जाधव यांची सावंतवाडी तालुका युवा सेना मागासवर्गीय सेल सचिवपदी, नामदेव असनकर यांची युवा सेना मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्षपदी तसेच राकेश पवार यांचीही मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख संजु परब यांनी प्रदान केले. युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमुख राजेश जाधव यांनी निवड केली. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आमचे नेते दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनानुसार या निवडी झाल्या आहेत . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी करण्यात आले आहेत सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन परब यांनी केले आहे. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर ,सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई ,गजानन नाटेकर, अर्चित पोकळे, विनोद सावंत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.