For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनींवरील झाडी साफ करा

04:48 PM Mar 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनींवरील झाडी साफ करा
Advertisement

न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकरसह ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावात वारंवार वीज खंडित होत असून त्याचा त्रास न्हावेली गावातील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह ग्रामस्थांनी आज सावंतवाडीत विद्यूत महामंडळच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले की, लाईन साफ नसल्यामुळे कालच्याच झालेल्या वा-यामुळे झाडांवरील लाईन तुटून न्हावेली-टेंबवाडी येथे पडले. त्यामुळे त्याच्या फटका टेंबवाडील ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागले. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी विद्युत प्रवाहाला अडथळा करणारी झाडे न तोडल्याने व विद्युत तारा हि सुरळीत नसल्यामुळे शॉट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे विजेचा लपंडाव सुरुच आहे. वीज पुरवठा वरवर खंडीत होत असल्यामुळे ग्राहकांची वीज उपकरणे नादुरुस्त होत आहे. याला महावितरण अधिकारीच सर्वस्वी असल्याचे मत सर्व सामान्य नागरिकांनी व्यक्त केले. न्हावेली गावातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वीज वाहिनीवरील झाडी मोठ्या पावसाळयाआधी साफ करावे अन्यथा महावितरणच्या कार्यालयात येऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी उपसरपंच श्री.पार्सेकर यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित राज धवन प्रथमेश नाईक ओम पार्सेकर , निलेश परब उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.