For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वच्छता हा दिनक्रम बनावा : रवी बंगारेप्पनवर

10:26 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वच्छता हा दिनक्रम बनावा   रवी बंगारेप्पनवर
Advertisement

कंग्राळी खुर्दमध्ये स्वच्छता ही सेवा कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राहिल्यास जीवन आरोग्यपूर्ण बनणे शक्य  आहे. स्वच्छता हा दिनक्रम बनला पाहिजे. घराच्या स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्थळावरील स्वच्छतेच्या कामात नागरिकानी सहभागी झाले पाहिजे. तसेच स्वच्छतेबाबत जागृती केली पाहिजे, असे विचार जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पनवर यांनी व्यक्त केले. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने गुऊवारी कंग्राळी खुर्द येथे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कऊन ते बोलत होते.

त्यानंतर, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्राम पंचायतीच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी संयुक्तपणे गावात स्वच्छता कार्यक्रम राबविला. तसेच स्वच्छतेची शपथही घेतली. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, सहसंचालक बसवंत कडेमनी, ग्राम पंचायत विकास अधिकारी, जिल्हा पंचायतीच्या स्वच्छ भारत योजनेचे कर्मचारी, तालुका पंचायत, ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ ांनी भाग घेतला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.