महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे स्वच्छता हीच सेवा अन् वृक्षारोपण

11:18 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. महात्मा गांधींसह देशातील अनेक नेत्यांनी हा संदेश दिला आहे. त्या संदेशाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तवय आहे. स्वच्छता हीच सेवा या घोषवाक्याद्वारे जिल्हा कायदा सेवा प्राधिकार व वकील संघटना आणि वनविभागाच्यावतीने स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश त्यागराज इनवळ्ळी हे होते. आपला परिसर आपणच स्वच्छ केला पाहिजे. कचरा फेकताना त्याचा विचार केला पाहिजे.

Advertisement

कचऱ्याची उचल केली जाते, मात्र जनतेनेही त्याला सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे न्या. त्यागराज यांनी सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनीही आपले विचार व्यक्त केले. जेएमएफसी न्यायालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. तेथील कचऱ्याची उचल करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे अभियंता हणमंत कलादगी व मनपाचे सफाई कर्मचारी हे देखील उपस्थित होते. त्यांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला. या अभियानांतर्गत न्यायालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे.

Advertisement

मातेच्या नावाने एक झाड लावा

वृक्षारोपण करणे हे महत्त्वाचे आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी आता वृक्षारोपण केलेच पाहिजे. प्रत्येकाने यामध्ये भाग घेतला पाहिजे. आपल्या मातेच्या नावाने एक झाड दरवर्षी लावा, त्यानंतर आपणच त्याचा अनुभव घेऊ शकतो, असे सांगून जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांनी वृक्षारोपण केले. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात खुल्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनविभागाचे एसीएफ नागराज बाळेहोसूर, आरएफओ पुरुषोत्तम रावजी, वनक्षेत्रपाल विजय गौडर, सचिव मुरली मनोहर रेड्डी, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article