For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा किनाऱ्यावर ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम

05:01 PM May 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आचरा किनाऱ्यावर ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहीम
Advertisement

ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग

Advertisement

आचरा प्रतिनिधी

आचरा किनाऱ्यावर मोठया प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. किनाऱ्यावर मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा साठला होता. आचरा किनारा स्वच्छ सुंदर राहावा म्हणून आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांना घेऊन स्वछता मोहीम राबवत आचरा किनारा स्वच्छ केला आहे .या मोहिमेत सरपंच जेरोन फर्नांडिस , उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले , ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, पुर्वा तारी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब गिरीश आपकर रुपेश परब सिध्देश वराडकर, दयू बिनसाळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. मोहिमेची माहिती देताना सरपंच जेरोन फर्नांडीस म्हणाले की किनाऱ्यावर मोठया प्रमाणात पर्यटक येत असून आचरा किनारा स्वच्छ किनारा अशी ओळख आहे. मोठया प्रमाणात किनाऱ्यावर कचरा साठला होता. गावाचा किनारा स्वच्छ दिसावा म्हणून ही मोहीम राबवली आहे. किनाऱ्यावर व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांनी आपली जबाबदारी ओळखून आपला कचरा साठवून त्याची विल्हेवाट लावावी असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.