Urmodi River | जकातवाडी परिसरात उरमोडी नदीकाठ स्वच्छता मोहीम उत्साहात
उरमोडी नदीच्या संवर्धनासाठी साताऱ्यात जनजागृती मोहीम
सातारा : सातारा तालुक्यामध्ये तीन नद्या प्रामुख्याने असून त्यातली उरमोडी नदीचा काठ हा परळी भागात महत्वाचा असून जकातवाडी या गावाच्या परिसरात जिल्हा परिषद आणि सातारा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने नदी काठचा परिसर स्वच्छता मोहिम राबवली. त्यामध्ये स्वतः सभापती महेश गाडे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांचाही सहभाग असल्याने मोहिमेतल्या सदस्यांना आणखी बळ मिळाले.स्वच्छतेबाबत एकदा शब्द दिल्याप्रमाणे सभापती महेश गाडे हे एकदाच मोहिम घेवून थांबले नाहीत. त्यांनी पुढच्याहीमोहिमांचे नियोजन केले आहे. त्यानुसार दुसरी मोहिम त्यांनी जकातवाडी या गावच्या परिसरात नदी काठ ब उघड्यावर पडणाऱ्या कचरा व्यवस्थापन मोहिम राबवली.
या मोहिमेत सभापती महेश गाडे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष पवार, पंचायत समिती सदस्य शोभा लोटेकर, सरंपच कोमल दळवी, विस्तार अधिकारी (पं) निकम, स्वच्छता विभागाचे तालुका समन्वयक अमित गायकवाड, हेमा बहदे, प्रियांका देशमुख, श्रीमती साळुंखे, श्रीमती कांबळे, श्रीमती वाघमारे, गायकवाड, महाले ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सातारा पंचायत समिती सातारा मधील वरिष्ठ सहायक विक्रमसिंह पाटसुपे यांनी याबाबत नदीचे आत्मकथन व्यक्त करताना सांगितले की, 'मी उरमोडी.. तुमच्या जिल्ह्याची तहान भागवणारी एक माता. तुम्ही माझ्या काठावर येऊन स्वच्छता केली, फोटो काढले, हे बघून बरं वाटलं. पण खरंच सांगा,
तुमच्या काळजात माझ्याबद्दल प्रेम आहे की फक्त सोपस्कार? जेव्हा तुम्ही माझ्या पात्रात प्लास्टिकची पिशवी, निर्माल्य किंवा सांडपाणी सोडता, तेव्हा माझा श्वास गुदमरतो. माझं नाव 'उरमोडी' आहे, म्हणजे जिला कधीही खंड पडत नाही. पण जर असाच कचरा साठत राहिला, तर मी फक्त गटार बनून उरेन. आज विचार करा, उद्या जर माझं पाणी विष झालं, तर ते तुमच्या लेकराबाळांना पाजणं तुम्हाला सोसेल काय? हा कचरा तुमचा नाही, तर तो माझ्या अस्तित्वावरचा डाग आहे."
मोहिमेत सातत्य राहिल
आसपासच्या शहरी भागातून किंवा इतर भागातून जो कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जातोय, त्यासाठी सातारा पंचायत समिती सातारा यांच्या मार्फत ही मोहीम दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी राबविण्यात आलेली आहे.
सुशिल संसारे गट विकास अधिकारी