कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ

03:15 PM May 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा गावात राबवली जाणार स्वच्छता मोहीम

Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

आचरा ग्रामपंचायत आचरा मार्फत स्वच्छ आचरा सुंदर आचरा अभियान दिनांक 1मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात शुक्रवारी सकाळी करण्यात आली. यावेळी आचरा टेंबली ते आचरा तिठा मार्ग चकाचक करण्यात आला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात व इतर जागेतील कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सरपंच जेरोन फर्नाडीस ,उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, चंदू कदम, पुर्वा तारी, उद्योजक अभय भोसले, गुरु कांबळी, यश मिराशी, पोलीस पाटिल तन्वी जोशी, जगनाथ जोशी, मिताली कोरगावकर ,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब ,गिरीश आपकर, रुपेश परब ,सिध्देश वराडकर, तुषार परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मोहिमेची माहिती देताना सरपंच जेरोन फर्नांडीस म्हणाले की, गावातील सर्व ग्रामस्थांमार्फ़त कचरा श्रमदानातून गोळा केला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्थांनी एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदान करायचे आहे. तसेच प्रत्येक ग्रामस्थाने आपला घरामध्ये तयार होणारा ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यामध्ये भरून कंपोस्ट खड्डा भरू. आपले गाव स्वच्छ ठेवू . या जिल्हा परिषदेच्या मोहिमेत सहभाग घेऊन आचरा गाव स्वच्छ ठेवायचे आहे व अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच फर्नांडीस यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # aachra
Next Article