डॉ .नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्गात स्वच्छता अभियान
मालवण । प्रतिनिधी
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयात रविवार १ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजल्या पासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले .याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण रुग्णालय मालवण येथे ४६० श्रीसदस्यांनी ४ टन, पशुवैदयकीय दवाखाना जानवली येथे ३९० श्रीसदस्यांनी ७ टन, शिरोडा वेळागर समुद्रकिनारा येथे ३८४ श्रीसदस्यांनी १६ टन ६०० किलो, पवनचक्की व गार्डन देवगड येथे १०४ श्रीसदस्यांनी ३१० किलो व देवगड समुद्रकिनारा येथे १४७ श्रीसदस्यांनी १६५० किलो कचरा गोळा केला . या अभियाना अंतर्गत या पाच ठिकाणावर एकूण १४८५ श्रीसदस्य उपस्थित होते व अंदाजित २३ टन ५६० किलो कचरा संग्रहित करून १७८४४ चौ.मी. परिसर, २ कि.मी. समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण, चिंदर, गावराई, परुळे, हळवल, जानवली, गोठणे, कुवळे, फोंडाघाट, कासार्डे, तळेरे, वैभववाडी, नांदगाव, कसाल, शिरोडा, पिंगुळी, बांदा, चराठा, माणगाव, तळबडे, वेंगुर्ला, ओरोस, मुटाट, बाडा, जामसंडे, शिरगाव, बागमळा अशा एकूण २७ बैठका सहभागी झाल्या. या कार्यक्रमा अंतर्गत मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर श्री. दीपक पाटकर उपनगराध्यक्ष मालवण, सौ. पूनम चव्हाण आरोग्य सभापती, श्रीम. जयमाला मयेकर माजी नगरसेविका, ग्रामीण रुग्णालय मेडिकल ऑफिसर श्री. बालाजी पाटील, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वर्ग १ च्या अधिकारी डॉ. ज्योती निशिकांत खरे, सौ. लतिका रेडकर, सरपंच शिरोडा, सौ. सुमती मसुरकर परव, पंचायत समिती सदस्य, श्री. निलेश मयेकर मंडळ निरीक्षक, श्री. मनी मोरजकर पोलीस पाटील, श्री. प्रसाद कदम पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरोडा सबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.