धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सिंधुदुर्गात स्वच्छता अभियान
मालवण । प्रतिनिधी
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा मालवण यांच्यावतीने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आज सकाळी ८. ३० वाजल्यापासून राबविण्यात आले . याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बिच समुद्रकिनारा,मालवण, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी.फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात १० ठिकाणावर एकूण २३७६ श्री सदस्य उपस्थित होते व अंदाजित ८१ टन कचरा संग्रहित करून 39500 चौ.मी. परिसर, 10 कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.