सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने प्लॅस्टिक मुक्त गडकिल्लेचा संकल्प
आचरा । प्रतिनिधी
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक दिवसीय स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. इनामदार श्री देव रामेश्वर आचरा यांना शिवप्रेमींकडून श्रीफळ ठेवून मोहिमेचचा शुभारंभ करण्यात आला. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी १० वा. श्री शिवराजेश्वरांचे दर्शन घेऊन किल्ले सिंधुदुर्गवर प्रत्यक्ष आपल्या स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. यात प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले हे ध्येय ठरवले असून किल्ल्यावरील कचऱ्याची शिवप्रेमींकडून साफसफाई करण्यात आली . ही मोहीम सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत राबविण्यात आली. यात किल्ल्यावरील स्थानिक व्यापारी तसेच काही पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच आपली संस्कृती आणि आपला इतिहास हा आताच्या तरूण पिढीने जपला पाहिजे असा संदेश गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या शिवप्रेमीनी दिला.या मोहिमेत अध्यक्ष हर्षद मेस्त्री, वरद जोशी, प्रथमेश चव्हाण, स्वप्नील शिर्सेकर, चतुर त्रिंबककर, आकाश मेस्त्री, सोहम घाडीगावकर, आनंद चिरमुले, नारायण पाताडे, पंकज ठाकूर, चंद्रकांत त्रिंबककर, भावेश घागरे, प्रसाद गुरव, राजु पालकर, ओमकार गोसावी, हर्ष हडकर आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते.