For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रेमींकडून किल्ले भगवंतगडावर स्वच्छता मोहीम

12:46 PM Nov 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
शिवप्रेमींकडून किल्ले भगवंतगडावर स्वच्छता मोहीम
Advertisement

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा अभिनव उपक्रम

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

जागतिक वारसा सप्ताह दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे सदस्य व शिवप्रेमींनी चिंदर येथील किल्ले भगवंतगडावर आज स्वच्छता मोहीम राबवत एक अभिनव उपक्रम राबवला. लोकांना सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे महत्त्व समजणे त्यांचे संरक्षण करणे तसेच भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष वरद जोशी यांनी सांगितले. या स्वच्छता मोहीमेत प्रथमेश चव्हाण ,सोहम घाडीगांवकर, राजन पालकर, स्वप्निल शिर्सेकर, आकाश मेस्त्री, नारायण पाताडे आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.