For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगामी निवडणुकीतही होणार सफाई!

06:37 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आगामी निवडणुकीतही होणार सफाई
Advertisement

नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधानांचे मार्मिक उद्गार :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भारत मंडपमध्ये देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना नॅशनल क्रिएटर्स पुरस्काराने शुक्रवारी गौरविले आहे. यादरम्यान त्यांनी युवांशी संवाद साधला. नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार कहाणी ऐकविणे, सामाजिक परिवर्तनाची कास, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण आणि गेमिंगसमवेत अन्य क्षेत्रांमध्ये उत्तम कार्याला चालना देण्यासाठी प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींनी पहिला नॅशनल क्रिएटर्स पुरस्काराच्या दाखल स्वच्छता राजदूत पुरस्काराने मल्हार कलांबेला सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्यावर कलांबाने पंतप्रधान मोदींसोबत सफाईशी संबंधित व्हिडिओ तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. याच्या उत्तरादाखल तुला संधी मिळेल, हे सर्वप्रकारच्या सफाईसाठी उपयुक्त ठरू शकते, आगामी निवडणुकीतही सफाई होणार असल्याचे मार्मिक उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

कुणाला मिळाला पुरस्कार

पुरस्कारविजेते                       श्रेणी

कीर्तिका गोविंदासामी           सर्वश्रेष्ठ कथाकार

रणवीर अल्लाहबादिया         डिसरप्टर ऑफ द ईयर

पंक्ती पांडे                 ग्रीन चॅम्पियन

जया किशोरी           सामाजिक परिवर्तन

मॅथिली ठाकूर                   सांस्कृतिक राजदूत

ड्रू हिक्स                     आंतरराष्ट्रीय क्रिएटर

कामिया जानी                 प्रवास

गौरव चौधरी            तंत्रज्ञान

मल्हार कलांबे                  स्वच्छता

जान्हवी सिंह           हेरिटेज फॅशन

श्रद्धा                         मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर्स (महिला)

आरजे रौनक           मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर्स (पुरुष)

नमन देशमुख                  शिक्षण

अंकित बैयानपुरिया               आरोग्य आणि फिटनेस

निश्चय (ट्रिगर इंसान) गेमिंग

अरिदमन                           बेस्ट मायक्रो क्रिएटर

पीयूष पुरोहित                  बेस्ट नॅनो क्रिएटर

अमन गुप्ता             सेलिब्रिटी क्रिएटर

पहिला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सोहळा महाशिवरात्रीच्या शुभदिनी आयोजित होत आहे आणि माझ्या काशीमध्ये तर शिवशिवाय काहीच चालू शकत नाहच. शिव भाषा, कला आणि क्रिएटिव्हीचे जनक मानले गेले आहेत. आमचे शिव नटराज आहेत. शिवाच्या डमरूतून माहेश्वर सूत्र प्रकट झाले आहेत. शिवाचे तांडवलय सृजनाचा पाया रचणारी आहे. आज (शुक्रवार) आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, परंतु मी पहिल्यांदाच येथे उपस्थित पुरुषही टाळ्या वाजवत असल्याचे पाहत आहे. पुरस्काराने सन्मानित सर्व मुलींचे मी अभिनंदन करतो. या सर्वांबद्दल मला अत्यंत गर्व आहे. देश आणि जगातील महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देत असल्याचे मोदींनी कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

1.5 लाख जणांकडून नामांकन

20 श्रेणींमध्ये यंदा राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी 1.5 लाखाहून अधिक जणांनी नामांकन केले होते.   यानंतर वोटिंग राउंडमध्ये विविध पुरस्कार श्रेणींमध्ये  डिजिटल क्रिएटर्ससाठी सुमारे 10 लाख मते पडली आहेत. यानंतर तीन आंतरराष्ट्रीय क्रिएटर्ससोबत 23 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.