कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांकडून सेंट मेरी चर्चची स्वच्छता
11:16 AM Sep 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत कॅम्प परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बेळगाव परिसरातील एक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या सेंट मेरी चर्च येथे कॅन्टोन्मेंट कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. सीईओ राजीवकुमार यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम घेण्यात आली. सेंट मेरी चर्चची स्वच्छता करण्यासोबतच परिसरातील कचरा जमा करण्यात आला. याबरोबरच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे यासाठी कॅन्टोन्मेंट ऑफिसमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. कार्यालयीन कौशल्य वाढविण्यासोबतच आरोग्याची काळजी व स्वच्छता याविषयीची माहिती राजीवकुमार यांनी दिली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article