वडगाव पाटील गल्लीतील ‘त्या’ चेंबरची सफाई
वारंवार चेंबर ब्लॉक होत असल्याने नागरिकांत भीती
बेळगाव : पाटील गल्ली, वडगाव परिसरात ड्रेनेजची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली आहे. याबाबत महानगरपालिकेला कळवूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मंगळवारपासून एक चेंबर ब्लॉक झाला होता. तो चेंबर बुधवारी सकिंग यंत्राद्वारे साफ करण्यात आला. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह इतर नागरिकांनी चेंबर साफ करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ड्रेनेजची समस्या या परिसरात वारंवार भेडसावत आहे. अचानकपणे चेंबर ब्लॉक होत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकवेळा महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या. तरी देखील त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे शेवटी स्वत:सकिंग मशीन आणून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो चेंबर साफ केला.
तोडगा काढण्याची मागणी
सध्या चेंबर साफ केला तरी ब्लॉक होण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मनपाने पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, जयराम हलगेकर, पांडू भोसले, हणमंत जाधव, अभिजीत बाळेकुंद्री, प्रभाकर बाळेकुंद्री, प्रसाद जुवेकर व नागरिक उपस्थित होते.