Skin Care Tips : गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करताय?
Skin Care Tips : चेहरा सुंदर दिसावा यासाठी स्किनची काळजी सगळेच घेतात. यासाठी मग फेशियल,मास्क, महागडे स्किन प्रोडक्टचा वापर केला जातो. याचबरोबर अनेकजण चेहरा सतत थंड पाण्याने धुत असतात. मात्र बरेजन आंघोळीबरोबर चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात. केवळ आंघोळीबरोबरच नाही तर इतरवेळीही गरम पाण्याने चेहरा धुवायची सवय असते मात्र ही सवय तुम्हाला नुकसानकारक ठरू शकते. कसे जाणून घेऊया.
गरम पाणी तुमच्या त्वचेतील सर्व नैसर्गिक तैलांश काढून टाकतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते.सतत गरम पाण्याचा वापर केल्याने स्किन कोरडी होऊन सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्वचेची जळजळ देखील होऊ शकते. याचबरोबर स्क्रिनला खाज सुटणे, लालसरपणा येऊ शकतो. विशेषत:ज्या महिलांची स्किन संवेदनशील असते अशा महिलांना हा त्रास जास्त होतो.
नियमित गरम पाण्याच्या वापराने स्किनवर रक्ताचे छोटे ठिपके देखील तयार होऊ शकतात.स्किन फुटल्यासारखी दिसते आणि चेहऱ्यावर डाग उठायला सुरु होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे लहान वयातच सुरकुत्या पडू शकतात.यामुळे शक्यतो चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. ज्यांना थंड पाणी सहन होत नाही त्यांनी कोमट पाण्याचा वापर करावा. याशिवाय अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.