कॅनडात खलिस्तान समर्थक पोलीस अधिकाऱ्याला क्लीनचिट
ट्रुडो सरकारचा खरा चेहरा पुन्हा समोर
वृत्तसंस्था/ टोरंटो
खलिस्तान समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला पॅनडाच्या सरकारने क्लीनचिट दिली आहे. कारवाई मागे घेण्याच्या या पवित्र्यातून ट्रुडो सरकारचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. 3 नोव्हेंबरला कॅनडातील निदर्शनात सहभागी लोकांनी ब्रॅम्प्टनमधील एका हिंदू मंदिराच्या आवारात जाऊन भाविकांवर हल्ला केला होता. या मंदिर हल्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा पोलीस अधिकारी हरिंदर सोही आत्मसमर्पण करण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच अनेक व्हिडिओंमध्ये सोही आक्रमकपणे खलिस्तानी ध्वज फडकवताना दिसला होता. जमाव भारतविरोधी घोषणा देत असताना पील पोलीस दलातील अधिकारी सोही यांनी खलिस्तानी झेंडा हातात घेतला होता. पॅनडाच्या स्थानिक पील पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे.