शास्त्रीय गायनाने रसिकांची सायंकाळ संगीतमय
कोल्हापूर :
उत्तम आलाप... नटखट हरकती... यांचा जादुई संगम साधत प्रसिद्ध शास्त्राrय गायक धनंजय हेगडे यांच्या वैविध्यपूर्ण स्वर साजाने पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाची सुरेल सुरुवात केली. तसेच पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या भारदस्त स्वरसाजाने रसिकांना मोहिनी घातली. शास्त्राrय गायन वादन महोत्सवाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या गायनाने रसिकांची सायंकाळ संगीतमय झाली.
गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. पंडित विनोद डिग्रजकर, डॉ. दीपक अंबर्डेकर, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, गंधार डिग्रजकर, श्रीकांत लिमये, विनोकुमार लोहिया, सुधीर पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात धनंजय हेगडे यांचे गायन झाले. राग पुरिया (विलंबित बंदिश) विलंबित एकताल, तर मारवा आणि ऐ पिया गुणवंता या बंदिशी व मधुर रागाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची उंची वाढवली. तसेच दृत बंदिशीमध्ये मै करआई पिया संग, ठुमरी चलत पायल बाजे बंदिशी गाऊन रसिकांची मने जिंकली. तालमध्ये दृत तीनतालाचे सादरीकरण केले. राग तिलक कामोदमध्ये मध्यलय बंदिश गायली. तर मध्यलय तीनताल आणि निर भरन कैसे जाऊ या बंदिशीचे गाऊन करुणा आणि भक्ती रसप्रधान राग गायल्यानंतर रसिक भक्तीच्या सूरात न्हाऊन गेले होते. हेगडे यांनी मन मै मोहन बिराजे दृत बंदिशी आणि दृत एकताल गाऊन संत विजय दास ही पंडित भीमसेन जोशींची प्रसिद्ध रचना गाऊन पहिल्या सत्राचा समारोप केला.
दुसऱ्या सत्राची सुरूवात पंडित रघुनंदन पणशीकर यांनी प्रथम सुर साघे या राग भुप विलंबित बंदिशीने केली. दृत बंदिशीमध्ये सहेला रे ही बंदिशी गायली. त्याला ताल गंधर्वी अध्ध्याची जोड दिल्याने रसिकांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. करुणा आणि भक्ती रसप्रधान रागाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन तालात जय जगत जननी बाई बंदिशी सादर करून कार्यक्रम उंचीवर नेवून ठेवला. तर तीनतालातील बनवारी शाम मोरी या बंदिशीने शास्त्राrय गायन सांगितिक मैफिलीची सांगता झाली. तबला साथ महेश देसाई, हार्मोनियम सारंग कुलकर्णी, तानपुऱ्यावर आनंद धर्माधिकारी रूद्ननाथ कुलकर्णी यांनी साथसंगत केली.