For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीचा निकाल आज नाही; उद्या शक्य

12:21 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बारावीचा निकाल आज नाही  उद्या शक्य
Advertisement

निकालाबाबत परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Advertisement

बेंगळूर : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत असलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 7 एप्रिल रोजी जाहीर होणार नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यांकन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश निट्टाली यांनी दिले आहे. बहुतेक बुधवार दि. 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात 28 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत बारावी परीक्षा-1 पार पडली होती. शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा परीक्षेचा निकाल लवकर हाती लागेल, याचा आनंद विद्यार्थी आणि पालकांत होता. परंतु, परीक्षा मंडळाने मंगळवार 7 रोजी निकाल जाहीर होणार नाही. कधी जाहीर होईल, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

बागलकोट व दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागू आहे. मंगळवारी सायंकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बुधवार 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्याचा विचार परीक्षा मंडळाने चालविला आहे. परीक्षेचा निकाल ‘डीजी-लॉकर’ अॅपवर देखील उपलब्ध केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.