10 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा
पणजी : गोवा बोर्डाची बारावीची परीक्षा येत्या 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणी निश्चित केलेल्या एकूण 20 परीक्षा केंद्रांतून ती घेतली जाणार आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 18,689 परीक्षार्थिंनी नोंदणी केली असून त्यात 17,759 हे नियमित परीक्षार्थी आहेत तर उर्वरित काही विषय घेऊन बसणारे आहेत. काहीजण रिपिटर असून काहीनी टक्केवारी वाढवण्यासाठी पुन्हा परीक्षेची नोंदणी केली आहे. नियमित उमेदवारांमध्ये 9253 मुली तर 8498 मुले आहेत. ही परीक्षा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. बारावीसाठी आवश्यक असणारी प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच घेण्यात आली आहे. इंग्रजी प्रश्नपत्रिकेने 10 फेब्रुवारी रोजी परीक्षेची सुरुवात होणार असून व्यावसायिक शाखेची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. नंतर 12 फेब्रुवारी रोजी इकोनॉमिक्स, 13 रोजी बँकिंग, 14 रोजी मराठी तर 15 रोजी हिंदी परीक्षा होणार आहे. पुढे 17 फेब्रुवारी रोजी सोशियोलॉजी, 18 रोजी फिजिक्स, अकौंटन्सी, हिस्ट्री या विषयांची परीक्षा आहे. केमिस्ट्री - बिझनेस स्टडीज 21 फेब्रववारी रोजी तर सायकोलॉजी 22 रोजी, मॅथेमॅटिक्स 24 रोजी, केंकणी 25 रोजी, बायोलॉजी 27 तर 28 रोजी जिऑग्राफीची परीक्षा निश्चित करण्यात आली आहे.