बारावीचा निकाल आज दुपारनंतर
01:20 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बारावीचा निकाल गुरुवार दि. 9 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केला जाणार आहे. सकाळच्या सत्रात पदवीपूर्व शिक्षण विभाग व मंत्री मधु बंगारप्पा यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. http://www.karresults.nic.inया संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून पीयुसी द्वितीय वर्षाचा निकाल केव्हा लागणार, याबाबत प्रतीक्षा होती. दि. 7 किंवा 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमुळे निकालाला विलंब झाला. पुढे होणाऱ्या पुरवणी परीक्षांचा विचार करून गुरुवार दि. 9 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement