For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'या' तारखेपासून होणार परीक्षेला सुरुवात

01:01 PM Oct 14, 2025 IST | NEETA POTDAR
दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर   या  तारखेपासून होणार परीक्षेला सुरुवात
Advertisement

       बारावीची परीक्षा 10, तर दहावीची 20  फेब्रुवारीपासून

Advertisement

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या १२ वी आणि १० वी परीक्षांच्या तारखांचे 'प्रकटन' जारी केले आहे. १२ वीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे, तर इयत्ता १० बीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत चालणार असल्याची माहिती मंडळाने सोमवारी येथे दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार असून, एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन शुक्रवार, २३ जानेवारी ते सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित केल्या जाईल. यात माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा देखील समावेश आहे.

Advertisement

दहावीसाठीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सोमवार, २ फेब्रुवारी ते बुधवार १८ फेब्रुवारी पर्यंत चालतील. यामध्ये शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असेल. दरम्यान, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी दोन्ही फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या तारखा विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत

Advertisement
Tags :

.