For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : अंबाबाई मंदिर परिसरात राडा; मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर नारळ फेकून हल्ला

03:37 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   अंबाबाई मंदिर परिसरात राडा  मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेवर नारळ फेकून हल्ला
Advertisement

                                       अंबाबाई मंदिर परिसरात आईला मारहाण

Advertisement

कोल्हापूर :  अंबाबाई मंदिर परिसरात मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईलाच मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी घडली. मारहाणीत पद्मी शरद नरवडे (वय ५०, रा. पाटील गल्ली, टेंबलाईवाडी), आदित्य महेश जाधव (रा. गंगाई लॉन, फुलेवाडी रिंगरोड) हे जखमी झाले.

याबाबतची फिर्याद नरवडे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कात्रट (वय ४०, रा. लक्षतीर्थ वसाहत). दीपा गायकवाड (वय ४५, रा. बुधवार पेठ), आदिनाथ जाधव (वय २२. रा. सानेगुरुजी) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. अंबाबाई मंदिर परिसरात नरवडे व कात्रट यांचा लागूनच पूजा साहित्य विक्रीचा स्टॉल आहे. मंगळवारीसायंकाळी नरवडे यांचा मुलगा प्रसाद व कात्रट गायकवाड व जाधव यांच्यासोबत वाद झाला होता. यानंतर प्रसाद याची आई नरवडे व त्यांच्या मुली संबंधितांना प्रसाद याला का मारहाण केली, याचा जाब विचारण्यासाठी गेल्या.

Advertisement

यावेळी कात्रट, गायकवाड, जाधव यांनी तुम्ही कोण विचारणार, असे म्हणत दमदाटी केली.तसेच शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत नारळ फेकून मारला. यामध्ये फिर्यादी नरवडे यांच्या डोक्याला नारळ लागला. मारहाणीत नरवडे व त्यांच्या मुली जखमी झाल्या. त्यानंतर नरवडे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Advertisement
Tags :

.