For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : मालगावमध्ये भाड्याच्या घरात लाईट दिल्याने दोन गटात राडा

04:30 PM Jan 20, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   मालगावमध्ये भाड्याच्या घरात लाईट दिल्याने दोन गटात राडा
Advertisement

                मिरज मालगावमध्ये भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शनवर राडा

Advertisement

मिरज : मिरज तालुक्यातील मालगाव येथे भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शन दिल्याच्या कारणातून एकाच भावकीतील दोन गटात राडा झाला. या मारामारीत दोन्ही गटाकडील सातजण जखमी झाले आहेत. याबाबत लक्ष्मी महेश आवटी (वय ३०) आणि सुरेश आण्णाप्पा आवटी (वय ५२) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन्ही गटाकडील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मी आवटी यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सुरेश आवटी यांनी घराजवळ असलेल्या भाड्याच्या खोलीत लाईट कनेक्शन दिले होते. याचा जाब विचारण्यासाठी लक्ष्मी यांचे दिर उमेश गेले असता, त्यांना सुरेश आवटी, विनोद आवटी, रेखा आवटी, प्रदीप मल्लाप्पा आवटी यांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

Advertisement

तर दिलीप आवटी यांनी लक्ष्मी आवटी यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारुन नुकसान केले. प्रदीप आवटी यांनी लाकडी बॅटने महेश आवटी व उमेश आवटी यांना मारहाण केली. याबाबत दोन्ही गटांनी मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाकडील आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Tags :

.