सावंतवाडीत शिवसेना -भाजप समर्थकांमध्ये राडा
03:48 PM Dec 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
भाजपकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाट्ल्याचा शिवसेनेचा आरोप
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी खासकीलवाडा भागात मंगळवारी निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थकांत राडा झाला . पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोन्ही घटना बाजूला करत प्रकरण शांत केले. मतदान होत असताना भाजप समर्थक मतदारांना पैसे वाटप करत होते असा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने त्यांना जाब विचारला. यावरून दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची आणि धक्का बुक्की झाली शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भाजप समर्थकांवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी दखल न घेतल्यास आम्ही कारवाई करू असा इशारा दिला.
Advertisement
Advertisement