For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime News | एका भेटीची भीषण अखेर! सडोली खालसा येथे आठ जणांचा राडा; करवीर तालुका हादरला

12:14 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime news    एका भेटीची भीषण अखेर  सडोली खालसा येथे आठ जणांचा राडा  करवीर तालुका हादरला
Advertisement

                               सडोली खालसात किरकोळ वादातून तरुणावर हल्ला

Advertisement

कोल्हापूर : सडोली खालसा येथेसोमबार ४ रोजी किरकोळ कारणातून झालेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला. यामध्ये आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत शुभम राजाराम पाटील (वय २८ रा. हिरवडे खालसा ता. करवीर) हा जखमी झाला. याबाबतची फिर्याद शुभम पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे.

यानुसार अरविंद मगदूम, विशाल मगदूम, सुशांत बेलेकर, कृष्णात मगदूम, सर्जेराव मगदूम (सर्व रा. सडोली खालसाता. करवीर), प्रमोद पायमल, ओंकार पायमल, सुधाकर पायमल (तिघे रा. मंगळवार पेठ कोल्हापूर) यांच्याबर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, शुभम पाटील हा सडोली खालसातील प्रमोद मगदूम यांना भेटण्याासाठी त्यांच्या घरी गेला असता त्या ठिकाणी किरकोळ कारणातून शुभम यांना मारहाण झाली. यावेळी शुभमला शिवीगाळ करत लाथा, बुक्की तसेच लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शुभम जखमी झाला.

Advertisement
Tags :

.