संघर्ष करणाऱ्या मुंबई, लखनौदरम्यान आज मुकाबला
वृत्तसंस्था
मुंबई : गुणतालिकेत तळाशी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा सामना करताना, मुंबई इंडियन्सला जरी या हंगामातील आयपीएल प्ले-ऑफसाठी पात्र होण्याची शक्यता आता जवळपास पूर्णपणे मावळली असली, तरी अशी आशा असेल की, त्यांचे सध्या संघर्ष करत असलेले स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवतील.
पांड्या (146 धावा आणि 4 बळी) आणि सूर्यकुमार (186 धावा) यांचा आतापर्यंतचा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या प्रवासात विशेषत: माजी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मोठा अडथळा निर्माण झाला आह. रोहित हंगामाच्या सुऊवातीला झालेल्या धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरत पुनरागमनाच्या मार्गावर आहे. नऊ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आल्यामुळे पाच वेळचे विजेते असलेल्या मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत तळाकडून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
आयपीएल प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याची त्यांची आशा आता जवळपास संपुष्टात आली असली, तरी पात्र होण्याची एक अत्यंत क्षीण शक्यता अजूनही शिल्लक आहे. पण त्याआधी मुंबई इंडियन्सला त्यांच्या भारतीय स्टार खेळाडूंकडून’कठीण प्रसंगी संघाला सावरणाऱ्या कामगिरीची गरज आहे, जी त्यांनी आतापर्यंत केलेली नाही. मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत कठीण गेल्यामुळे, पांड्याचे नेतृत्व आता चर्चेचा आणि चिकित्सेचा विषय बनले आहे. रणनीतीच्या बाबतीत, त्याचे निर्णय पूर्णपणे चुकीचे ठरले आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचे, तर त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. परंतु त्याची फलंदाजी मात्र अत्यंत निराशाजनक राहिली आहे.
मुंबई इंडियन्सप्रमाणेच लखनौ सुपर जायंट्सचा प्रवासही राहिला आहे. दोन्ही संघांना फलंदाजीतील सामूहिक अपयशाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ‘एलएसजी’चा कर्णधार रिषभ पंतने आपल्या संघासाठी विश्रांतीची आग्रही मागणी केली आहे. सलग पाच सामने गमावल्यामुळे हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर घसरला आहे.
एलएसजीने हंगामाची सुऊवात पराभवाने केली असली, तरी त्यानंतर सलग दोन विजय मिळवून त्यांनी जोरदार पुनरागमन केले होते. मात्र ज्या टप्प्यावर त्यांच्या कामगिरीने गती पकडणे अपेक्षित होते नेमक्या त्याच वेळी त्यांचे नशीब फिरले. गोलंदाजांनी एकत्रितपणे केलेली काहीशी चांगली कामगिरीही फलंदाजीतील सुमार कामगिरीची उणीव भरून काढू शकलेली नाही. त्यात कर्णधार पंतही सध्या एका नाजूक वळणावर उभा आहे. त्याच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीवरच आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एलएसजीसमोर आता एक अत्यंत व्यस्त आठवडा उभा आहे, ज्यामध्ये त्यांना अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत तीन अत्यंत महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, रायन रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ए. एम. गझनफर, अश्वनी कुमार, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मणिमारन सिद्धार्थ, आवेश खान, मोहम्मद शमी, दिग्विजय सिंह राठी, प्रिन्स यादव.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.