For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : यात्रेत डीजे लावायचा नाही, असं का म्हणतोस?, दोन गटांत तुंबळ हाणामारी

04:38 PM May 19, 2025 IST | Snehal Patil
satara news   यात्रेत डीजे लावायचा नाही  असं का म्हणतोस   दोन गटांत तुंबळ हाणामारी
Advertisement

याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Advertisement

कराड : कोरेगाव (ता. कराड) येथे गावच्या यात्रेवेळी डिजे आणि फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अक्षय अरुण सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून, सुरज दळवी, ओंकार सावंत, सिद्धार्थ पाटील, ओमसाई सावंत, शंभू सावंत, ऋषिकेश सावंत (सर्व रा. कोरेगाव) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गावच्या यात्रेवेळी शाळेजवळ बॅनर लावण्याच्या कारणावरून संशयितांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

तसेच संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे अक्षय सावंत हा जखमी झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार कांबळे तपास करीत आहेत. सुरज विलास दळवी याने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश उर्फ अक्षय अरुण सावंत, पंकज सावंत, उदय सावंत, अरुण सावंत, अविनाश सावंत, भानुदास सावंत, जालिंदर सावंत यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात्रेत डीजे लावायचा नाही, असे का म्हणतोस, असे म्हणून संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयितांनी सुरज दळवी याच्यासह त्याची आत्या व मामालाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार बैले तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.