माधवनगर येथे दोन गटात हाणामारी
सांगली :
मिरज तालुक्यतील माधवनगर मधील रविवार पेठेतील चांदणी चौकात शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन गटात जुन्या वादातून जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन्हीकडील चौघेजण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे एकूण १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माधवनगर येथील चांदणी चौकात राहणाऱ्या संदीप शामराव वायदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपी रोहन अमर मोहिते याच्याविरूध्द विनयभंगाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या तक्रारीचा राग मनात धरून या प्रकरणांतील साक्षीदार योगेश तलवारे यांना त्यांनी काठीने व सायलेनसर तसेच दगडाने मारहाण केली आहे. तसेच शिवीगाळ देवून दमदाटी केली आहे.
यामध्ये फिर्यादी संदीप आणि त्यांच्या साडूचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्यांनी मारहाण करणाऱ्या रोहन अमर मोहिते, प्रकाश किसन आवळे, ओंकार अमर मोहिते, किसन आवळे, सतीश तिवडे, अभिषेक तिवडे (सर्व रा. रविवार पेठ माधवनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटाकडून प्रकाश किसन आवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्चा भाचा हा फिर्यादीच्या घराजवळ ओरडत असल्याने आवळे कुंटुंबीय बाहेर आले. त्यावेळी त्याला काय झाले असे विचारले असता त्यांने मला जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केली असल्याचे सांगितले.
तसेच संशयितांनी कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे सांगितले. यामध्ये फिर्यादी प्रकाश आवळे आणि त्याचा भाचा रोहन मोहिते हे जखमी झाले आहेत.
आवळे यांनी संशयित म्हणून संदीप वायदंडे, सपना वायदंडे, योगेश तलवार, बाबू वायदंडे, यशोदा तलवार, सुरेश तलवार, अमर तलवार, गंगाधर तलवार आणि लखन तलवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. या दोन्ही बाजूच्या तक्रारीनंतर संजयनगर पोलीसांनी तपास सुरू केला आहे.