महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली जामिया विद्यापीठात दोन गटांमध्ये हाणामारी

06:14 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅलेस्टाईन झिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे तणाव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या संघर्षादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच विद्यार्थिनींबाबत अशोभनीय टिप्पणी केल्यानंतर दोन गटात जोरदार राडा झाला. या संघर्षात जखमी विद्यार्थ्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या एका गटाने घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इतर गटांनीही घोषणाबाजी केली. यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले, असे डीसीपी रवीकुमार सिंह यांनी सांगितले. हाणामारीची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि विद्यार्थ्यांना समज देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तणावाची परिस्थिती पाहता बुधवारी दिवसभर विद्यापीठात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article