For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एआय करारानंतर ‘एचसीएल’चा समभाग वधारला

06:23 AM Jun 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
एआय करारानंतर ‘एचसीएल’चा समभाग वधारला
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

आयटी क्षेत्रामधील कंपनी एचसीएल टेक यांचा समभाग मंगळवारी शेअर बाजारात 3.8 टक्के इतका तेजीत दिसून आला. एआय स्टार्टअप सर्वम एआय या मध्ये 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक कंपनीने करण्याचे ठरवले आहे. यानंतर जागतिक ब्रोकरेज फर्म नोम्युरा यांनी समभाग 1600 रुपयांपर्यंत वर जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविला आहे.

समभाग मंगळवारी इंट्राडे दरम्यान 3.8 टक्के वाढत 1161 रुपयांवर पोहोचला होता. आर्टिफिशल इंटेलिजेन्स अर्थात एआयचा वापर करण्यासाठी सर्वच कंपन्यांची गडबड सुरू झाली असून एचसीएल टेकही आता यामध्ये सहभागी झाली आहे. सर्वम एआयमध्ये कंपनीने वरील प्रमाणे गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. ब्रोकरेज फर्म समभाग येत्या काळामध्ये 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असे म्हटले आहे. एचसीएल टेकने सर्वममध्ये 1427 कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.