For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे देशव्यापी आंदोलन; 2 ऑक्टोबरपासून सुरुवात

05:48 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी cjpचे देशव्यापी आंदोलन  2 ऑक्टोबरपासून सुरुवात
Advertisement

मुंबई | प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) 2 ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे. आंदोलनाची सुरुवात मुंबईतून करण्यात येणार असून, त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये आंदोलन नेण्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दिपके यांनी SIR प्रक्रियेशी संबंधित मतदार यादीबाबतही आक्षेप नोंदवत, 2025 मधील मतदार यादी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर CJPने आंदोलनाची तीव्रता वाढवत ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

आंदोलन मुंबईपुरते मर्यादित न ठेवता पुढील टप्प्यात देशातील विविध शहरांमध्ये नेण्यात येईल, असे दिपके यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविल्याचे वृत्त आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादी आणि SIR प्रक्रियेबाबत आपली प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे CJPच्या आरोपांवर आणि मागण्यांवर पुढील काळात संबंधित संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

.