For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिटी स्पोर्ट्स, साईराज वॉरियर्स विजयी

10:55 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिटी स्पोर्ट्स  साईराज वॉरियर्स विजयी
Advertisement

बीडीएफए चषक आंतरक्लब साखळी स्पर्धा: बाळकृष्ण चौगुले इम्पॅक्ट खेळाडू

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक आंतरक्लब साखळी फुटबॉल स्पर्धेत निपाणी संघाला युनायटेड गोवन्सने बरोबरीत रोखले, सिटी स्पोर्ट्सने टीएफईचा 3-1 तर साईराज वॉरियर्सने निपाणीचा 4-0 असा पराभव केला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून करण माने, सुफियान सय्यद, अथर्व जाधव तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून झिशानअली कित्तूर, बाळकृष्ण चौगुले व ऋषिकेश यांना गौरविण्यात आले.

सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात निपाणी संघाला युनायटेड गोवन्सने 1-1 असे बरोबरीत रोखले. 18 व्या मिनिटाला सुजिद पुटाणेच्या पासवर करण मानेने गोल करुन 1-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात इम्तियाजच्या पासवर झिशानअली कित्तूरने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण हा सामना बरोबरीत राहिला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात सिटी स्पोर्ट्सने टीएफएचा 3-1 असा पराभव केला. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या नजिम इनामदारच्या पासवर सुफियान सय्यदने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 46 व्या मिनिटाला सुफियान सय्यदच्या पासवर नजिम इनामदारने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 56 व्या मिनिटाला टीएफएच्या विनय नाईकच्या पासवर बाळकृष्ण चौगुलेने गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. 62 व्या मिनिटाला नजिम इनामदारच्या पासवर तिसरा गोल करुन 3-1 असा विजय मिळवून दिला.

तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने निपाणी एफसीचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 व्या मिनिटाला अथर्व जाधवच्या पासवर स्वप्नील भोपितेने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 19 व्या मिनिटाला शाहू काटकरच्या पासवर अथर्व जाधवने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 39 व्या मिनिटाला स्वप्नील भोपितेच्या पासवर शाहू काटकरने तिसरा गोल केला. तर 60 व्या मिनिटाला शाहू काटकरच्या पासवर अथर्व जाधवने चौथा गोल करुन आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिली.

आजचे सामने

  • साईराज एफसी व टिळकवाडी एफसी, दुपारी 2.30 वाजता
  • सिटी स्पोर्ट्स व गोवन्स स्पोर्ट्स क्लब, दुपारी 4.00 वाजता
Advertisement
Tags :

.