शहर, ग्रामीण, खानापूर अंतिम फेरीत
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या उपांत्य सामन्यात खानापूरने बेळगाव ग्रामीणचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे महापौर मंगेश पवार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी एन. आर. पाटील, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, उद्योजक के. आर. शेट्टी, स्पोर्ट्स फाउंडेशनचे पुनित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब अध्यक्ष राकेश कांबळे, सचिव पवन कांबळे, पीईओ जहिदा पटेल, साधना बद्री, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्वीया डिलिमा, सचिव प्रवीण पाटील, नागराज भगवंतण्णावर, बापू देसाई या मान्यवरांच्या हस्ते भारत माता फोटो पूजन व फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी, किरण तरळेकर, अनिल जनगौडा, रामलिंग परीट, अर्जुन भेकणे, संतोष दळवी, चंदकांत पाटील, उमेश बेळगुंदकर, माऊती मगदूम, शिवकुमार सुतार, उमेश मजुकर, आय. एम. पटेल, अनिल गंभीर, पंच मानस नायक, हर्ष रेडेकर, विजय रेडेकर, शुभम यादव, कौशीक पाटील, यांनी काम पाहिले. याप्रसंगी विविध तालुक्मयातील क्रीडा शिक्षक सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलींच्या गटात बेळगाव शहर व बेळगाव ग्रामीण संघानी प्रतिस्पर्धेचा पराभव करीत अंतिम करीत प्रवेश केला. माध्यमिक मुलांच्या गटात खानापूरने बेळगाव ग्रामीणचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर मुलींच्या गटात बेळगाव ग्रामीणने खानापूरचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.